Krushi Darbar

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय

Turmeric Market

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय

 

Turmeric Market  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १८) हळदीची ३५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १५००० ते कमाल १७५०० रुपये तर सरासरी १६२५० रुपये दर मिळाले.

संत नामदेव हळद मार्केटमध्ये (Turmeric Market) आठवड्यातील सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी हळदीची आवक घेतली. मागील आठवड्यापासून यंदाच्या हंगामातील नवीन हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली.

मागील आठवडयात सोमवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १५) या कालावधीत हळद ६६५० क्विंटल आवक झाली. त्या वेळी हळदीला सरासरी १६७२५ ते १७३०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १५) हळदीची २८५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १५५०० ते कमाल १७६०० रुपये तर सरासरी १६५५० रुपये दर मिळाले आहे.

बुधवारी (ता. १३) हळद २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १६५०० ते कमाल १८१०० रुपये तर सरासरी १७३०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) १३०० क्विंटल आवक होऊ प्रतिक्विंटल किमान १५१०० ते कमाल १८३५० रुपये तर सरासरी १६७२५ रुपये दर मिळाले आहे.

वसमत १०८९० ते १७६९० रुपये

वसमत समितीमध्ये शनिवारी (ता. १६) हळदाची ५४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०८९० ते कमाल १७६९० रुपये तर सरासरी १४२९० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १५) ५७३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल २०००० रुपये तर सरासरी १५३०० रुपये दर मिळाले आहे.

मंगळवारी (ता. १२) १०७६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १२००० ते कमाल २१६०० रुपये तर सरासरी १६८०० रुपये दर मिळाले.

मागच्या बुधवारपासून नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. दररोज २५०० ते ३५०० क्विंटल आवक आहे. दरात चढ-उतार सुरू आहे. सध्या सरासरी दर १५ हजार रुपयांवर आहेत.
– नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली.

हळद बाजारभाव खालील प्रमाणे  : (Turmeric Market)

 

शेतमाल : हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)
समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/03/2024 Turmeric Market
हिंगोली क्विंटल 3000 15000 17000 16000
बसमत लोकल क्विंटल 940 10000 18205 14102
सांगली राजापुरी क्विंटल 16493 15400 25200 20300
16/03/2024
मुंबई लोकल क्विंटल 220 15000 20000 17500
बसमत लोकल क्विंटल 450 10890 17690 14290
बसमत (कुरुंडा) लोकल क्विंटल 129 12000 16800 15200
सांगली राजापुरी क्विंटल 18176 15200 22000 18600
15/03/2024
नांदेड क्विंटल 1304 12000 18000 15000
हिंगोली क्विंटल 2850 15500 17600 16550
वाशीम लोकल क्विंटल 300 10100 15800 12500
मुंबई लोकल क्विंटल 189 15000 20000 17500
बसमत लोकल क्विंटल 573 10600 20000 15300
जिंतूर नं. १ क्विंटल 21 14500 15200 14500
सांगली राजापुरी क्विंटल 19967 14800 26200 20500
लोहा राजापुरी क्विंटल 32 12000 15300 13500

Turmeric Market

स्रोत : agrowon.esakal.com

नवीन माहिती

Lemon Market
बाजारभाव

Lemon Market : लिंबाचे दर १०,००० रुपये क्‍विंटल ! लिंबू बाजारभाव

Lemon Market : लिंबाचे दर १०,००० रुपये क्‍विंटल ! लिंबू बाजारभाव   Lemon Market : मॉन्सूनोत्तर व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लिंबाचा हस्त बहार प्रभावित झाला होता. त्यानंतरच्या काळात आंबिया

संपूर्ण माहिती वाचा ..
Fish Farming
कृषी योजना

Fish Farming : मत्स्यपालकांना मिळणार आता किसान क्रेडिट कार्डवर कर्ज : वाचा संपूर्ण माहिती

Fish Farming : मत्स्यपालकांना मिळणार आता किसान क्रेडिट कार्डवर कर्ज : वाचा संपूर्ण माहिती Fish Farming : केंद्र आणि राज्य सरकारांकडून लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला जातोय.

संपूर्ण माहिती वाचा ..
Turmeric Market
बाजारभाव

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय   Turmeric Market  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १८) हळदीची

संपूर्ण माहिती वाचा ..
Weather Update
हवामान अंदाज

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती   Weather Update  नागपूरसह परिसरात उष्म्यात वाढ झाल्याने पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवार( ता.१६)

संपूर्ण माहिती वाचा ..
Scroll to Top