Krushi Darbar

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती

Weather Update

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती

 

Weather Update  नागपूरसह परिसरात उष्म्यात वाढ झाल्याने पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवार( ता.१६) विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीने परिसराला झोडपून काढले. यामुळे शहराच्या काही भागात झाडे उन्मळून पडली. तसेच घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडालेली होती. यातच आता हवामान विभागाकडून नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून गरज नसताना घराबाहेर पडून नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

हवामान विभागाचा अलर्ट( Weather Update) हवामान विभागाकडून १८ आणि १९ मार्च रोजी नागपूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची माहिती हवामान विभागाने दिली. शनिवारी( ता.१६) सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या देवगिरीसह काही भागात झाडे उन्मळून पडली. तर काही भागांतील घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली. वादळी वाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीसह रिझर्व्ह बँके जवळ, सुगतनगर, अशोकनगरसह शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासह वीजपुरवठाही खंडित झाला होता. Rain Update.

महाराष्ट्रासह या भागात पावसाची शक्यता( Weather Update) महाराष्ट्रासह पुढील चार दिवसांत केरळ, माहे, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये उष्ण आणि दमट हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य भारतातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

स्रोत : agrowon.esakal.com

नवीन माहिती

Lemon Market
बाजारभाव

Lemon Market : लिंबाचे दर १०,००० रुपये क्‍विंटल ! लिंबू बाजारभाव

Lemon Market : लिंबाचे दर १०,००० रुपये क्‍विंटल ! लिंबू बाजारभाव   Lemon Market : मॉन्सूनोत्तर व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लिंबाचा हस्त बहार प्रभावित झाला होता. त्यानंतरच्या काळात आंबिया

संपूर्ण माहिती वाचा ..
Fish Farming
कृषी योजना

Fish Farming : मत्स्यपालकांना मिळणार आता किसान क्रेडिट कार्डवर कर्ज : वाचा संपूर्ण माहिती

Fish Farming : मत्स्यपालकांना मिळणार आता किसान क्रेडिट कार्डवर कर्ज : वाचा संपूर्ण माहिती Fish Farming : केंद्र आणि राज्य सरकारांकडून लोकसभा निवडणूका लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला जातोय.

संपूर्ण माहिती वाचा ..
Turmeric Market
बाजारभाव

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय

Turmeric Market : नव्या हळदीची हिंगोलीत आवक सुरू ! दर १७५०० पर्यंत मिळतोय   Turmeric Market  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १८) हळदीची

संपूर्ण माहिती वाचा ..
Weather Update
हवामान अंदाज

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती

Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचं सावट ! शेतकऱ्यांची चिंता वाढली ! वाचा संपूर्ण माहिती   Weather Update  नागपूरसह परिसरात उष्म्यात वाढ झाल्याने पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवार( ता.१६)

संपूर्ण माहिती वाचा ..
Scroll to Top